चंद्रपुर – देश अत्याधूनिकतेच्या दिशेने वळत आहे त्यामूळेच सरकारी नोकरभरतीत पारदर्शकता यावी, सर्व प्रक्रिया ऑनलाईन व्हावी, म्हणून महापरीक्षा पोर्टल सुरू करण्यात आले. मात्र, भरती अंतर्गत परीक्षेचा गोंधळ, चुकीची प्रश्नपत्रिका, सदोष निकाल, उत्तरतालिकांतील त्रुटी यामुळे परीक्षार्थीनी पोर्टलवर हरकती घेतल्या आहे. त्यामूळे विद्यार्थांना शंका असलेली परिक्षा प्रणाली बंद केली गेली पाहिजे, अशी मागणी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून महापरिक्षा पोर्टल बंद यावे या मागणीचे त्यांनी महाराष्ट्राचे मूख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. विशेष म्हणजे किशोर जोरगेवार यांनी महापरिक्षा पोर्टल बंद करण्यात यावा या मागणीकरिता राज्यातला पहिला भव्य मोर्चा ही चंद्रपूरात काढला होता.