राजुरा विधानसभेतील विविध समस्यांवर मा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा.

राजुरा – विधानभवन नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उध्दवराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्य़ातील विविध समस्यासंदर्भात आढावा सभा घेण्यात आली. या प्रसंगी राजुरा विधानसभेतील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील प्रश्न उपस्थित केले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
यात प्रामुख्याने अवकाडी पावसाने शेतकर्यांचे झालेले नुकसान व उपाययोजना, जलसंधारण विषयक प्रगती, जि. प. अंतर्गत रस्त्यांची स्थिती, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना कामांची सद्यस्थिती, अपुर्ण जलसिंचन प्रकल्प आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याचा आढावा, कृषीपंपांना पुरेसा विज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणारी घरे- उद्दिष्ट व साध्य, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ग्रामीण) योजनेचा आढावा, हागणदारी मुक्त गावे – उद्दिष्ट व साध्य करण्यात येणारी कार्यवाही, कृषी संजीवनी योजनेचा आढावा, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचा आढावा, पोलीस गृहनिर्माण योजनेचा आढावा, वनहक्क दाव्याची माहिती, जिवती तालुक्यातील १४ गावाचा प्रश्न, जिवती तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम करणेसाठी येत असलेली अडचणी, गडचांदूर ते आदिलाबाद रेल्वे मार्ग निर्माण करण्यासाठी होत असलेला विलंब, राजुरा मतदार संघातील कृषी पंपाच्या भारनियमन मुक्त करण्याबाबतचा प्रश्न, राजुरा येथील पोलिस ठाणे १९१० साली बांधलेल्या इमारतीचा व कर्मचारी वसाहतीचा प्रश्न, राजुरा मतदार संघातील आदिवासी व गैर आदिवासी च्या जमिनीचा प्रश्न, वर्धा नदिवर बंधारा बराज निर्माण करण्याबाबत इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी आवर्जून उपस्थित होते.
