नागपूर मनपा महापौर संदीप जोशींवर गोळीबार, थोडक्यात बचावले जोशी


नागपुर-एकीकडे नागपुर हिवाळी अधिवेशन सुरू असतांना व पोलिसांचा चोख बंदोबस्त असतांनाच नागपूर महानगरपालिका महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला झाल्याने आता नागपुर च्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . या हल्ल्यात महापौर जोशी थोडक्यात बचावले. २ अज्ञात हेल्मेट धारी बाईकस्वार हल्लेखोरांनी महापौर जोशी यांच्यावर एकूण ३ गोळ्या झाडून ते पसार झाले.
सदर घटना अमरावती आउटर रिग रोडवर घडली असून हल्ल्याच्या वेळी महापौर स्वत: गाडी चालवत होते. म्हटले जाते की, महापौर संदीप जोशी हे काल वर्धा मार्गावर असलेल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळील रसरंजन हाँटेल वर त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते सुमारे १२ वाजण्याच्या सुमाराला आपले कुटुंबीय आणि मित्रांसह नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत एकूण सात गाड्या होत्या,. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांच्या गाड्या त्यांच्या गाडीच्या पुढे होत्या. जोशी यांची फॉर्च्युनर ही गाडी सर्वांच्या मागे धावत होती. त्यांचा ताफा राष्ट्रीय कर्करोग संस्थेजवळ येताच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. हल्ल्यादरम्यान हल्लेखोरांनी जोशी यांच्या फार्च्युनर गाडी क्र. एम. एच. ३१ डि ए – २७०० वर एकूण ३ गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या गाडीच्या काचा भेदून आत शिरल्या. मात्र सुदैवाने त्याना कोणतीही ईजा झाली नाही महापौरांना आले होते ६ डिसेंबरला धमकीचे पत्र
महापौर जोशी यांनी नागपूर शहरामधील बाजार परिसरातील वाहतुकीची कोंडी दुर करण्यासाठी अतिक्रमण हटविण्यासाठी मनपातर्फे कारवाई चे आदेश दिले होते. या शिवाय नागपूर शहरात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठिकठिकाणी १०० तक्रार बॉक्स लावले होते. यातील एका बॉक्समध्ये संदीप जोशी यांना जीवे मारण्याच्या धमकी चे निनावी पत्र आले होते. या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. जोशी यांनी याची तक्रारही दाखल केली होती.
परंतु नागपुर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल न घेतल्यानेच महापौर संदीप जोशी यांचेवर हा जीवघेणा हल्ला झाला. आता या घटनेचे आज नागपूर अधिवेशनात गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला अजुनही कायमस्वरूपी ग्रृहमंत्री न मिळाल्याने आता थेट महापौर जर सुरक्षित नसले तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय होणार?