28 Apr 2026, Tue

पोंभुर्णा तालुक्यातील शेतकर्यांना तात्काळ मदत देऊन  ओला दुष्काळ जाहीर करा – राजु झोडे

(शंकर महाकाली महाराष्ट्र प्रतिनिधि)
पोंम्भूर्णा – पोंभुर्णा तालुक्यातील अचानक पडलेल्या अतिव्रुष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले असुन हाती आलेले पिक गमावण्याची वेळ तालुक्यातील शेतकर्यांवर आलेली आहे.धान ,कापुस,तुर,सोयाबिन ईत्यादी अनेक पिकांची मोठी नुकसान झाली आहे त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असुन शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे येथिल शेतकर्यांना तात्काळ शासनाने नुकसान भरपाई द्यावी व पोंभुर्णा तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा करिता वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ पोंभुर्णा च्या वतीने राजुभाऊ झोडे यांच्या नेत्रुत्वात तहसिलदार पोंभुर्णा यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ जर वरिल मागणी पुर्ण झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी च्या वतिने तिव्र आंदोलनाचा ईशारा देण्यात आला.
निवेदन देतांना राजुभाऊ झोडे ,रुपेश निमसरकार ,अतुल वाकडे,विजया भसारकर,ममता ठेमस्कर,मायाताई मुन ,वनश्री गेडाम,पराग उराडे,अँड.रंजित खोब्रागडे,अजय उराडे व वंचित बहुजन आघाडी तथा भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्तागण व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *