बल्लारपुर – रोजी बुधवारी सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर,यांच्या नेतृत्वाखाली कोठारी सर्कल चे ए. जी. पंपाच्या लोडशेडिंग बंद करणे तसेच विद्युत पुरवठा चोविस तास शुरू करण्यास व साहेबांना मुळ समस्या कळविण्यात आले कि ८तास विद्युत पुरवठा मुळे शेतीची सिंचाई पुर्णपणे होत नाही व तेही विद्युत पुरवठा नियोजीत शेड्यूल प्रमाणे रात्री चा पाळी हे गाव जंगलाला लागुण असल्या मुळे त्यांना जंगली जनावरांमुळे जीवाचा धोका राहातो व त्यांना रात्री खूप त्रास करावा लागतो।
या कारणांमुळे विद्युत महावितरण द्वारे शेतकर्यांनवर होत असलेल्या अन्याय व त्रास चा विरोधात सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर यांच्या नेतृत्वाखाली गावाचे गावकरी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
विद्युत अधिक्षक अभियंता (महावितरण मंडळ चंद्रपूर)
यानां निवेदन दिले व समस्याचा लवकरात लवकर समाधाना करावा अशी मागणी केली हा निवेदन देताना प्रामुख्याने प्रकाश पाठक तालुका प्रमुख बल्लारपुर,
सौ. कल्पना गोरघाटे महिला उपजिल्हाप्रमुख,सुनील दुधबडे उप तालुका प्रमुख बल्लारपुर,
वासुदेव येरगुडे उपसरपंच किन्ही,शेख युसूफ उपशहर प्रमुख,बॉबी कादासी उपशहर प्रमुख,सुखदेव बांदुरकर, सुधाकर कौरासे,नारायण काकडे, प्रदिप कुमार,ऋषिदेव वासाडे,सुरेश वासाडे,संतोष ईटनकर,शंकर खोब्रागडे,गोविंदा उपरे,परिक्षीत अलोणे इतर गावकर्यांनी तसेचशिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली