राजुरा विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन.


राजुरा – जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे राजुरा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांबाबत आढावा बैठकचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी क्षेत्रातील अनेक ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली. दरम्यान क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन मा. जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यामुळे क्षेत्रातील विकास कामांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रसंगी भोगवटदार वर्ग -२ जमीनीचे भोगवटदार वर्ग १ मध्ये अंतर्गत करणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करणे, जिवती तालुक्यातील महाराष्ट्र आंध्रप्रदेश सीमेवरील १४ गावातील जमिनीची विशेष बाब म्हणुन मोजणी करणे, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वनहक्क मान्य करणे (अधिनियम, २००६ व नियम २००८ नुसार मंजुर दावे), जिवती तालुक्यातील आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमण धारण शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा लाभ मिळवून देणे, राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, गोंडपिपरी, जिवती व कोरपना तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मोबदल्याबाबत, राजुरा विधानसभा क्षेत्रातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजना घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देणेबाबत, राजुरा न प क्षेत्रातील माजी मालगुजारी तलाव सौंदर्यीकरण जागेत फेरबदल करणे, राजुरा शहरातील शिवाजी नगर वार्डातील श्री. कस्तुरकर यांचे घराजवळील अतिक्रमण मोकळे करणे, राजुरा शहरातील घरकुल बांधकाम करण्यासाठी जागा मागणीचा प्रस्ताव मंजुर करणे, न प राजुरा मध्ये अनुकंपा अंतर्गत कर्मचारी भरती करणे, मियावकी प्लानटेशन जागेचा ताबा देणेबाबत, राजुरा मध्ये क्रीडासंकुल निर्माण करणेबाबत, राजुरा शहरातील पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील महसूल विभागाचे अतिक्रमण हटविन्याबाबत, राजुरा येथील बेघर कॉलनी जवळील महसूल विभागाची जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्याबाबत, नगर पंचायत गोंडपिपरी येथे घनकचरा प्रकल्पासाठी जागा खरेदी प्रस्ताव मंजुर करणेबाबत, नगर पंचायत गोंडपिपरी येथे बांधकाम व पाणीपुरवठा अभियंता नियुक्त करणेबाबत, राजुरा तालुक्यातील वेकोलिने अधिगृहित केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नोकरीमध्ये सामाहून घेणे इत्यादी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी राजुरा विधानसभेचे आमदार मा. श्री. सुभाषभाऊ धोटे, मा. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मा. जिल्हाधिकारी भुगावकर, नगर प्रशासन अधिकारी सुनिल बल्हाळ, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, गोंडपिपरीचे नगराध्यक्ष सपना साकलवार, जिवतीचे नगराध्यक्ष पुष्पा नैताम, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, उपनगराध्यक्ष मनोहर चन्ने, उपनगराध्यक्ष असपाक शेख, उपविभागीय अधिकारी संजय कुमार डव्हळे, तहसीलदार राजुरा श्री रविंद्र हाेळी, तहसीलदार जिवती बेंडसे पाटील, तहसीलदार गोंडपिपरी गजभिये नगर सेवक आनंद दासरी, अमोल घटे उपसरपंच, मुख्याधिकारी विशाखा आदी मान्यवर उपस्थित होते.