चंद्रपूर – माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयात नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा हा निर्णय देशातील फक्त दोन शाळांकरिताच घेण्यात आला असून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्हयातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने वर्ष 2020 करिता मुलींना सैनिकी शिक्षण मिळण्याविण्याची दारे खुली झाली असून आता चंद्रपूर जिल्हयातील सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने मुलींसाठी प्रथमच सैनिकी शाळेत प्रवेश देणे सुरू केले आहे. पश्चिम दक्षिण भारतात चंद्रपूर येथील सैनिकी शाळेपासुन ही सुरूवात होत आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयात अत्याधुनिक स्वरूपाची सैनिकी शाळा चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर विसापूर गावानजिक उभारण्यात आली असून या सैनिकी शाळेत आता मुलींना सैनिकी शिक्षण घेण्याची मिळालेली संधी सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्वपूर्ण पुढाकारांपैकी एक मानला जात आहे.