25 Sep 2026, Fri

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला 

नागपूर : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी सहा मंत्र्यांचं तात्पुरतं खातेवाटप 12 डिसेंबरला जाहीर झालं. मात्र तरीही मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे. येत्या 24 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ होणार आहे. शिवसेनेचे 10, राष्ट्रवादीचे 11 तर काँग्रेसचे 8 मंत्री शपथ घेणार आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वाचं लक्ष आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचे 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री शपथ घेणार आहे. राष्ट्रवादीचे 8 कॅबीनेट आणि 3 राज्यमंत्री तर काँग्रेसचे 6 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.  हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने तात्पुरते खातेवाटप जाहीर केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *