मेरे तिरंगे की ओर गलत नजर से देखोगे तो ये नजर भी नही बचेगी
CAA च्या समर्थनार्थ चंद्रपूर निघाली विशाल जनसमर्थन रॅली

या देशात कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत, कामरूख पासून कच्छ पर्यंत 135 कोटी नागरिक जात, धर्म, रंग, वंश यांच्या बाहेर जावून नागरिकत्व सुधारणा कायद्याचे अर्थात CAA चे समर्थन करीत आहे. मात्र काही राजकारणी स्वार्थापोटी, खुर्चीसाठी या कायद्याला विरोध करत नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, अफवा पसरवत आहे. त्यांच्यासाठी राष्ट्रहीत महत्वाचे नाही, धर्मा धर्मात तेढ निर्माण करणे हा त्यांचा उद्देश आहे. या कायद्यामुळे कोणालाही धोका नाही. धर्माचा आधार घेवून आतंक निर्माण करणा-यांना खरा धोका आहे. या देशावर प्रेम करणा-या कोणत्याही नागरिकाला या कायद्याला घाबरण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी स्पष्ट केले आहे. या देशावर प्रेम करणा-या नागरिकाला या कायद्यामुळे नुकसान झाल्यास पंतप्रधान पद त्यागण्याची तयारी नरेंद्रभाईंनी दाखविली आहे. त्यामुळे या कायद्याची भिती बाळगण्याची कोणतेही कारण नाही असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 28 डिसेंबर रोजी गांधी चौक चंद्रपूर येथे CAA च्या समर्थनार्थ आयोजित रॅलीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांमध्ये आमच्या बौध्द, शीख, इसाई, हिंदू, सिंधी बांधवांवर अन्याय, अत्याचार केले जात होते. या देशातुन येणा-या नागरिकांसाठी 1955 मध्ये हा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार 12 वर्षापर्यंत नागरिकत्व दिले जात नव्हते. आता तो कालावधी कमी करून 5 वर्ष करण्यात आला आहे. यामुळे पोटदुखीचे कारणच काय असा सवाल त्यांनी यावेळी केला. भारतमातेवर, हिन्दुस्थानवर प्रेम करणा-या कोणताही नागरिकाला या कायद्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. जे याचा विरोध करीत आहेत त्यांची वृत्ती देशविरोधी आहे. पण अशांना आपण स्पष्ट सांगायचे आहे की, ‘मेरे तिरंगे की ओर गलत नजर से देखोगे तो ये नजर भी नही बचेगी’ असा ईशारा आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिला.
या कायद्यामुळे या देशातील कोणत्याही मुस्लीम धर्मीय बांधवाला कोणताही
