3 May 2026, Sun

नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) समर्थन म्हणजेच देशप्रेम

मुस्लीमांना पाकिस्तान व काॅंग्रेसने शांततेने जगुच दिले नाही, त्यांची दिशाभुल केली- हंसराज अहीर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह देशहितासाठी झटत असून त्यांची निती सुध्दा देशहितातच असते. नागरिकत्व संशोधन कायदा हा राष्ट्रहितातच असून देशातील कुठल्याही नागरीकांच्या विरोधात हा कायदा नाही. पाकीस्तान, बांग्लादेश, अफगाणीस्तान येथील अत्याचाराला बळी पडुन भारतात आलेल्या तेथील अल्पसंख्यांक हिंदु, शिख, ईसाई, बौध्द यांना देण्यासाठी आहे असे प्रतिपादन पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज चंद्रपूर येथे राष्ट्रीय चेतना मंचच्या वतीने आयोजित नागरीकत्व संशोधन कायदा समर्थनार्थ निघालेल्या भव्य रॅलीला संबोधित करतांना केले.
स्थानिक गांधी चैक येथून निघालेल्या भव्य रॅलीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हासंघचालक तुषारजी देवपुजारी, नगरसंघचालक अॅड. रविंद्रजी भागवत, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पूर्व पालकमंत्री तथा विद्यमान आ. सुधिर मुनगंटीवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस, माजी आ. अॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर राखीताई कंचर्लावार, शैलेश मुंजे, उपमहापौर राहुल पावडे, बंडुभाऊ पद्लमवार, विजय राऊत, राहुल सराफ, डाॅ. मंगेश गुलवाडे, अभाविप प्रांत अध्यक्ष प्रा. येनारकर, वनिताताई कानडे, रेणुकाताई दुधे, सुनिल महाराज, रघुविर अहीर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
नागरिकता देण्याचा कायदा आहे परंतु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये व नुकताच लोकसभा तसेच राज्यसभेत पारित झालेल्या कायदयानुसार आता 5 वर्षात नागरिकता देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. हा कायदा मुस्लीमांविरोधात असल्याबाबत काॅंग्रेस व विरोधी पक्ष संभ्रम पसरवीत असून मुस्लीम समाजाला भडकविण्याच पाप करित आहे, देशात अशांती व हिंसा पसरवित असल्याची टिका यावेळी हंसराज अहीर यांनी केली. परंतु त्यांच्या या क्रुर राजकारणामुळे जाळपोळीतून व अन्य हिंसक आंदोलनातून राष्ट्रीय संपत्तीचे अतोनात नुकसान होत आहे यासाठी सर्वस्वी काॅंग्रेस व ईतर विरोधी पक्ष जबाबदार आहे असेही यावेळी हंसराज अहीर यांनी सांगीतले.
देशाच्या हितासाठी कलम 370 व नागरिकता सुधारणा कायदîासारखे साहसी निर्णय प्रधानमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *