6 May 2026, Wed

कॉलरी रोड वरील खड्डयात बल्लारपूर युवक काँग्रेसने लावले बेशरमची झाडे…

बल्लारपूर-नगर पालिका ते कॉलरी कडे जाणाऱ्या रोड वर ठिकठिकाणी खड्डेच खडे पडले असून,या मार्गाने पायदळ व दुचाकीने ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.महत्वाचे म्हणजे या रोड ने कोळशाची वाहतूक मोठया प्रमाणात होत असल्याने रोडवर कोळशाचा धूर साचला असतो. त्यातच पावसाळ्यात या रोड वरील खड्यात कोळशाचे चिखल होते.आणि चारचाकी वाहना मुळे हेच चिखल पायदळ व दुचाकीने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर पडते.या खाद्यामुळे आजवर अनेक किरकोळ अपघात झाले आहे…

या रोड ची डागडुजी संबंधाने वेकोली अधिकाऱ्यांची भेट घेतली असता,ते हा रोड वेकोलीच्या कार्यक्षेत्रात येत नाही,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.तर या संबंधाने पालिकेला तक्रार केली असता हा रोड वेकोलीच्या हद्दीत असल्याने या रोड ची डागडुजी वेकिलीनेच करावी,असे पालिकेचे म्हणणे आहे.या मुळे रोड वरील खड्डयाकडे,कोणत्याच अधिकारी अथवा नगरसेवकांना घेणे देणे नसल्याचे स्पष्ट होते.

ही बाब गंभीर स्वरूपाचे असल्याने या कॉलरी रोड वरील जीवघेण्या खड्यांकडे वेकोली व नगर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने या रोड वरील खड्यात बेशरमाची झाडे लावण्यात आली,आणि प्रशासनाचा निषेध केला.बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात झालेल्या लक्षवेधी आंदोलनात प्रामुख्याने अरबाज सिद्दकी, नरेश गुंडापेल्ली, शंकर महाकाली महासचिव, जिशात सिद्दीकी,संदीप नक्षीने,विशाल बोकडे, पवन आडकीने,राजा केशकर,रुपेश रामटेके,क्षितिज खैरकार, सितु अंगुरी,विलास श्रीवास,एस.मेदलवार,नहींम अहमद,अखित खान,संतोष वर्मा,शोहेब अहमद,समर अहमद,राहुल भारती, राजू मुरारी,बाला वर्मा,वेणू वडलूरी,गौस भाई ,महेश गुप्ता,दीपक निर्मल, रईस खान,मोहन निषाद इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *