भादुर्णी येथे तालुका स्तरीय क्रिडा सम्मेलनाचे उदघाटन

मुल तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. भादुर्णी या गावातील अंतर्गत विकासकामांसाठी 2 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला असून उसराळा तसेच उसराळा चक या गावांसाठी 2 कोटी 50 लक्ष रू. निधी मी मंजूर केला. भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी 22 कोटी रूपयांचा निधी मंजूर . या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणा-या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नशील असून लवकरच या विषयासंदर्भात योग्य तोडगा निघेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 16 जानेवारी रोजी मुल तालुक्यातील भादुर्णी या गावात आयोजित तालुका स्तरीय क्रिडा सम्मेलनाचया उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, माजी सभापती पूजा डोहणे, उपसभापती घनश्याम जुमनाके, सौ. सविता सुनिल शेंडे, संवर्ग विकास अधिकारी श्री. कलोडे, भादुर्णीच्या सरपंच सौ. दिपीका शेंडे, उसराळाचे सरपंच बंडूभाऊ नरमलवार, भादुर्णीचे उपसरपंच संतोष रेगुंडावार, उसराळाचे उपसरपंच तुषार ढोले, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकला तोडासे, शुभांगी बोरूले, सविता शेंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, 2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा आपल्या क्रांतीकारकांना समाधान वाटेल असे काम करावे. मानव हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जायचे. मात्र आज मानव स्वार्थी प्राणी झाला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करण्याची आवश्यकता आहे. क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातुन ऐक्याचे दर्शन घडणयाची आवश्यकता आहे. महिला सशक्तीकरणावर व स्वावलंबनावर भर देत त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी प्रतिपादीत केली.
कार्यक्रमाला उसराळा, उसराळा चक व भादुर्णी येथील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
