बल्लारशा रेल्वे स्थानकावर निमार्णाधिन 26 कोचेसच्या पिट लाईन कार्याचा हंसराज अहीर यांनी घेतला आढावा.

बल्लारशा रेल्वे स्थानकावरून थेट रेल्वे गाडया सुरू होण्याचे स्वप्न या पिट लाईनमुळे साकार होतील- हंसराज अहीर

बल्लारपुर  – मध्य रेल्वे च्या बल्लारशा स्थानकावर निर्माण होत असलेली 26 कोचेस ची पीट लाईन म्हणजे या रेल्वे स्थानकावरून थेट रेल्वे गाडया सुरू करण्याची स्वप्नपूर्ती असून जिल्हयातील प्रवाशांचे व नागरिकांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून देशाच्या नकाशावर बल्लारशा रेल्वे स्थानकाचे महत्व वाढेल असे गौरवोद्गार पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बल्लारशा रेल्वे स्थानकावर 8 कोटी किंमतीची निर्माण होत असलेल्या पीट लाईन च्या कार्याचा आढावा घेतांना काढले.
बल्लारशा रेल्वे स्थानक हे मध्ये रेल्वे चे महाराष्ट्रातील शेवटचे महत्वपूर्ण जंक्शन असतांना या बल्लारशा रेल्वे स्थानकावरून थेट नवी दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नई अषा देषातील ईतर महत्वपूर्ण स्थानकांसाठी गाडी सुरू व्हावी अशी संकल्पना असतांना पिट लाईनच्या अभावामुळे हे शक्य होत नव्हते. याचीच दखल घेत बल्लारशा येथे पीट लाईन व्हावी ही मागणी रेटून धरली होती व लोकसभा सदस्य कार्यकाळात ती पूर्ण करित एप्रील 2019 मध्ये या पीट लाईन चे भुमीपूजन करण्यात आले होते अशी माहिती या आढावा भेटी दरम्यान पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
या पीट लाईनच्या निर्माणासााठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री पियुश गोयल यांचे हंसराज अहीर यांनी विशेष आभार व्यक्त केले. सदर आढावा भेटीदरम्यान झेडआरयुसीसी सदस्य दामोदर मंत्री,चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे सर्वश्री रमणीकभाई चव्हाण,श्रीनीवास सुंचूवार,डाॅ. भुपेश भलमे तर रेल्वे प्रशासनातर्फे सर्वश्री श्रीवास्तव जी, स्थानक प्रबंधक रामलाल सिंह, रेल्वे पोलीस दलाचे एस. के. मीश्रा, सि.आय. अन्नम, युवराज वारंगे, डाॅ. सुधार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.