पाणी पुरवठा सूरळीत करा अन्यथा तिव्र आंदोलन करु यंग चांदा ब्रिगेडचा ईशारा मनपा आयुक्तांना निवेदन

चंद्रपूर – इरई धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही चंद्रपूरकरांना तहाणलेल्या ठेवल्या जात आहे. ही चंद्रपूरकरांवर मोठा अन्याय असून चंद्रपूरातील पाणी पूरवठा तात्काळ सूरळीत करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून मागणीचे निवेदन महानगर पालिकेचे आयूक्त संजय काकडे यांना देण्यात आले आहे.

इरई धरणात मुबलक जलसाठा असुन सुध्दा शहरातील नागरिकांना अनेक महिण्यांपासून अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे, चंद्रपूरात मानवनिर्मीत भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. पाणी टंचाई हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे त्यामूळे नागरिकांमध्ये अधिक रोश आहे. शहरातील नागरिकांना दररोज मुबलक पाणी पुरवठा हवा असतो. मात्र, अद्याही शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही. मनपा प्रशासन वर्षांचा पाणीकर घेत असतात पिण्याचे पाणी मात्र 100 दिवसही देत नसणे हा अन्याय आहे. चंद्रपूरातील नागरिक हा मागील अनेक महिण्यांपासून पाणी कपातीच्या संकटाला तोंड देत आहे. मात्र आता त्याचा धिर सूटू लागला आहे. चंद्रपूरातील बाबूपेठ, भिवापूर, तुकूम, बंगाली कॅम्प, घूटकाळा या भागात पाण्याची समस्या आणखी बिकट आहे. याकडे पालिका प्रशासण जानिवपूर्ण दूर्लक्ष करत आहे. नागरिकांना प्यायला पाणी मिळत नसल्याने त्यांची चांगलीच दमछाट होतांना दिसत आहे. नारिकांना मुबलक पाणी देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र त्यात ते अपयशी ठरले आहे. असा आरोप यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. आज गुरुवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त संजय काकडे यांची भेट घेतली असून यावेळी चंद्रपूरातील मानवनिर्मीत पाणी संकटाचे भिषण वास्तव आयुक्तांना सांगिलते. तसेच चंद्रपुरातील पाणी पूरवठा सूरळीत न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी मनपा आयूक्तांनीही पाणी पूरवठा सूरळीत करण्याचे दिशेने योग्य पाऊल उचलल्या जाईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी दिपक दापके, दिपक पदमगीरवार, विनोद गोल्लजवार,विश्वजीत सहा,राजू जोशी,विनोद अनंतवार, करणसिंह बैस, राशीद हुशैन, कलाकार मल्लारप, ताहिर शेख,रूपेश पांडे वंदना हातगावकर, रुपा परसराम, कल्पना शिंदे, विदया ठाकरे, अस्मिता डोनारकर, दूर्गा वैरागडे, पुजा शेरकी, सुजाता बल्ली, नंदा पंधरे, आदिंची उपस्थिती होती