वाघाच्या बचावकार्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रेनिंग द्या – मनसे

वाघिणीच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याची ओळख सम्पूर्ण जगात ताडोबा अभयारण्यामूळे झालेली आहे त्याला प्रमुख कारण म्हणजे वाघ आणि ज्या जंगलाच्या राज्यामूळे ही ओळख मिळाली आहे तोच आज सुरक्षित नाही याला प्रमुख कारण म्हणजे वनविभागाचा निष्काळजी पणा आणि हलगर्जीपणा,एकीकडे चंद्रपूर जिल्हा आदिवासी तसेच औद्योगिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्यातले उद्योग नामशेष राहिले आहे आणि जिल्ह्यातील तरुण बेरोजगार झालेले आहेत तर जिल्ह्याची जमेची बाजू असलेलं म्हणजेच ज्याच्या मूळे अनेक लोकांचे परिवार आज जगत आहे आणि बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार ताडोबा अभयारण्य ते वाढत्या वाघांच्या मृत्यूमूळे सतत प्रकाश झोकात येत आहे हे आपल्या चंद्रपूर चे दुर्दैव आहे आणि याला सर्वस्वी जवाबदार वनविभागाचे उदासीन धोरण आणि उदासीन अधिकारी आहेत त्याच अधिकारी लोकांचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी सतीश चोपडे याना निवेदन देण्यात आले.
शिरणा नाल्यात पडून मृत झालेल्या वाघिणीच्या मृत्यू हा वाघाचा अपघाती मृत्यू नसून उशिरा व चुकीच्या झालेल्या रेस्क्यू मुळे व सक्षम यंत्रणा नसल्याने हा मृत्यू झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी यावेळी केला.
रेस्क्यू ऑपरेशन करताना कोणत्याही कर्मचाऱ्याला स्पेशल ट्रेनिंग दिली असल्याचे आढळून आले नाही, म्हणून ही बाब लक्षात घेता यापुढे रेस्क्यू करणारे कर्मचारी याना स्पेशल ट्रेनिंग द्यावी व सोबतच जर सामाजिक संघटनांना या ऑपरेशन दरम्यान सामावून घ्यायचे असल्यास त्यांना आधी ट्रेनिंग द्यावी व ट्रेनिंग पूर्ण केलेल्या सदस्यांनाच तिथे जाण्याची परवानगी द्यावी. तसेच घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी व दोषींवर कारवाही करून निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यापुढे अश्या घटना घडू नयेत त्याची खबरदारी घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेने दिला
सदर निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार,मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनसे जिल्हाउपाध्यक्ष सचिन भोयर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये देण्यात आले,यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर,मनवीसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे,मनवीसे शहर अध्यक्ष नितीन पेंदाम,शहर उपाध्यक्ष राकेश बोरीकर, करण नायर,शिरीष माणेकर, अनुप माथनकर,अर्चना आमटे,संजय फरदे, राकेश पराडकर तुषार येरमे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते