19 Jun 2026, Fri
ताजा खबरें

क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंती निमीत्‍त भाजपा कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्‍न

सावित्रीबाईंचा संघर्ष आम्‍हा सर्वांसाठी प्रेरणादायी – आ. सुधीर मुनगंटीवार


स्‍त्री शिक्षणाच्‍या प्रणेत्‍या क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीदिनानिमीत्‍त चंद्रपूरातील भाजपा जनसंपर्क कार्यालयात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाईंच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करून त्‍यांना अभिवादन करण्‍यात आले. आजच्‍या समाजातील शिक्षीत स्‍त्री ही सावित्रीबाई फुले यांची देण असून सावित्रीबाईंचा संघर्ष आम्‍हा सर्वांसाठी प्रेरणादायी असल्‍याची भावना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली.

यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी सावित्रीबाई फुले अमर रहे अशा घोषणा देत त्‍यांना अभिवादन केले. यावेळी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते राजेंद्र गांधी, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, मनपा सदस्‍य राजेंद्र अडपेवार, भाजपा नेते रामपाल सिंह, राजेंद्र खांडेकर, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, डॉ. अशोक जिवतोडे, डॉ. मंगेश गुलवाडे, श्रीनिवास मोहरील, संदीप पोशट्टीवार, अरूण मदनकर, हंसराज रायपुरे, मिलींद खोब्रागडे, अभय पाचपोर, भानेश चिलमिल आदींची उपस्थिती होती

सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीनिमीत्‍त निघालेल्‍या रॅलीत सहभाग

क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीनिमीत्‍त चंद्रपूर शहरात भव्‍य रॅली काढण्‍यात आली. चंद्रपूर शहरातील गिरनार चौकात ही रॅली येताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या सहका-यांसह रॅलीत सहभागी होत सावित्रीबाईंच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करत त्‍यांच्‍या स्‍मृतीला अभिवादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *