4 May 2026, Mon

चंद्रपूरातील शेतकरी बुलढाणा जिल्ह्यात अभ्यास दौऱ्यासाठी रवाना

कृषि विभागाचा उपक्रम

चंद्रपूर– एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2019-20 मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत प्रक्षेत्र प्रशिक्षण शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा दिनांक 3 ते 7 जानेवारी पर्यंत आयोजित केला आहे. या दौऱ्यात चंद्रपूर उपविभागातील चारही तालुक्यामधून 50 शेतकरी सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील आधुनिक शेती, नियंत्रीत शेती व उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास केला जाणार आहे.

याप्रसंगी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्याला शेतकऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौऱ्याच्या वाहनाला रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषि उपसंचालक आर.जे. मनोहर, उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय काळे व कृषि विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थित होती. उपस्थित मान्यवरांकडून सहभागी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी, चंद्रपुर दत्तात्रय काळे यांचे संकल्पनेतून करून सहभागी शेतकऱ्यांना दौरा किटचे वितरण केले व संपूर्ण पाच दिवसामध्ये होणाऱ्या दौऱ्यातील स्थळाबाबत सविस्तर माहिती दिली.

दौऱ्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिताफळ लागवड, भाजीपाला लागवड, सामुहिक शेततळे, करार शेतीव्दारे भाजीपाला बिजोत्पादन कार्यक्रम, शेडनेट मधील भाजीपाला, मसाला पिके, ब्रोकोली, रेड कॅबेज, सोयाबीन पासुन विविध पदार्थ बनविणे, मधुमक्षिका पालन, फळबाग, व मसाला पिके व शेततळयातील मत्सपालन इत्यादी प्रक्षेत्रांना जिल्हा बुलढाण्यातील मेहकर, देऊळगाव राजा, बुलढाणा, तुळजापुर, येळगाव, शेगांव, येऊलखेड व जळगाव जामोद असे एकविस स्थळांना भेटी देऊन दिनांक 07 जानेवारीला परतीचा प्रवास असणार आहे. सदर प्रक्षेत्र भेट यशस्वी करण्यासाठी कार्यालयातील कृषि सहाय्यक एस. के.घुगरे, तंत्र अधिकारी सलामे, भाष्कर गायकवाड, श्री तावाडे, बुग्गेवार, कृषि सहाय्यक सवडे व श्री साठवणे, रोशन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *