11 May 2026, Mon

घुग्घूस येथील प्रदूषण नियंत्रण व युवकांना रोजगार देण्या सन्दर्भात तातळीने अंमलबजावनी करावी.

घुग्घूस कांग्रेस तर्फे पालकमंत्री साहेबांशी चर्चा व निवेदन


घुग्घूस – चंद्रपुर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून या जिल्ह्यातील घुग्घूस शहर हा प्रमुख औद्योगिक जिल्हा असून येथे सीमेंट उद्योग, स्पंज आर्यन उद्योग, वेकोलीच्या खाणी असून देशातील सर्वात प्रमुख प्रदूषित शहरापैकी घुग्घूस प्रथम क्रमांकावर येतो येथील हवा ही श्वास घेण्या योग्य नसून येथील नागरिकांच्या दमा, कर्करोग ( कॅन्सर) हृदयाघात मुळे मरणपावणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
याप्रदूषणावर नियंत्रणा करीता तातळीचे पावले उचलण्या सन्दर्भात तसेच परिसरातील उद्योग झपाट्याने बंद पड़त असूनबेरोजगारी दिवसां -दिवस अतिशय उग्र होत आहे.
याकडे पालकमंत्री साहेबा सोबत घुग्घूस कांग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी कामगार नेते सैय्यद अनवर यांनी विस्तृत चर्चा केली असता घुग्गुस प्रदूषणनियंत्रनाला तसेच बेरोजगारी निर्मूलना करीता विशेष प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री मा. ना. विजय भाऊ वड्डेटीवार यांनी सुचविले आहे.
याप्रसंगी घुग्घूस काँग्रेसचे अजय उपाध्ये, अनिरुद्ध आवळे, बालकिशन कुलसंगे, शहजाद शेख, सचिन कोंडावार, विजय माटला, रमेश रुद्रारप, सीनू गुडला,रतन पालावर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *